जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२३
हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या कावड यात्रा गेल्या काही दिवसापासून श्रावण महिना सुरू झाल्यापासून या कावड यात्रा जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निघत आहे. या यात्रेदरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्ती यात हातभार लावून मदत करीत आहे. जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
जळगाव शहरा नजीक असलेल्या भगवान शिवांच्या मंदिरात पर्यंत जळगाव शहरातील विविध परिसरातून कावडयात्रेचे आयोजन तरुणांसह महिलांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी मनपाचे माजी उपमहापौर नगरसेवक अश्विन सोनवणे हे या यात्रेदरम्यान प्रत्येक भाविकांना रुद्राक्ष वाटप करीत करून आपले सेवा बजावीत आहे. यांच्या सोबत शैलेंद्र सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री मनोज चव्हाण, आसिफ सईद हे देखील या कार्यात सहभागी झाले आहे. यावेळी डॉ.अश्विन सोनवणे यांनी बोलतांना सांगितले कि, जळगाव शहरात जर कुणाला हि रुद्राक्ष हवे असतील तर त्यांनी लागलीच नगरसेवक अश्विन सोनवणे यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
का असते कावड यात्रा ?
कावड यात्रा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा श्रावण महिन्यात केली जात असून या यात्रेत भक्त गंगा नदीतून पाणी भरतात आणि ते आपल्या गावात किंवा मंदिरात असलेल्या शिवलिंगाला अर्पण करतात. कावड यात्रा ही भगवान शिवाच्या भक्तीसाठी केली जाते. असे मानले जाते की गंगा नदीचे पाणी भगवान शिवाचे अमृत आहे. हे पाणी पिण्याने भक्तांचे सर्व पाप धुतले जातात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते. कावड यात्रा ही एक कठीण यात्रा आहे. या यात्रेत भक्त पायी प्रवास करतात आणि गंगा नदीतून पाणी भरतात. या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, जसे की उष्णता, थकवा आणि भूक.कावड यात्रा ही एक सामाजिक कार्यक्रम देखील आहे. या यात्रेत भक्त एकमेकांच्या मदतीला धावतात. ते एकमेकांना पाणी भरण्यास, विश्रांती घेण्यास आणि खाण्यास मदत करतात. असा उल्लेख अनेकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत असतो.