जळगाव मिरर । २१ जानेवारी २०२३ ।
शिक्षणाचं माहेरघर अशी पुण्याची ओळख जरी असली तरी येथील शाळेच्या परिसरामध्ये दहावीतील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत असल्याने शहराचे नाव मात्र धुळीस मिळत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दहावीतील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका महिलेने मध्यस्थी केल्यानं हा वाद काही काळात शमला. शाळेतील किरकोळ वादावरून ही भांडणं झाल्याचं बोललं जात आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेर घर समजलं जातं मात्र याच पिंपरी चिंचवडमध्ये एका महाविद्यालयाच्या परिसरातून व्हिडीओ समोर आला आहे. विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही . दहावीतील विद्यार्थिनींमध्ये हाणामारी झाली आहे. दोघीही टायरच्या दुकानासमोर हाणामारी करताना दिसत आहे. एकमेकांचे केस धरून दोघीही एकमेकांवर तुटून पडलेल्या दिसत आहे. त्यांची हाणामारी सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र काही वेळ त्या ऐकायला तयार नव्हत्या. काही वेळानी दोघींचा वाद सोडवण्यासाठी एक महिला आली आणि तिनं मध्यस्थी केल्यानंतर वाद शमला. यावेळी रस्त्यावरील अनेकांनी गर्दी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.