जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
पंतप्रधानांच्या आवास परिवारात एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आधिकारिक सोशल मीडिया उकाउंटवर या विषयीची माहिती दिली असून त्यांनी या नव्या पाहुण्याचे नाव दीपज्योती ठेवले आहे. पंतप्रधान मोदी या व्हिडीओमध्ये एका गाईच्या वासरासोबत दिसत आहेत. हि घटना घडल्यानंतर काही वेळेनंतर जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या निवासस्थानी असलेल्या लक्ष्मी गाईने देखील एका वासरीला जन्म दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दि.१४ रोजी माहिती दिली असून पंतप्रधान मोदी या व्हिडीओमध्ये एका गाईच्या वासरासोबत दिसत आहेत. हि घटना ताजी असतांना दि.१४ रोजी दुपारच्या सुमारास माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या निवासस्थानी त्यांच्या लक्ष्मी गाईने एका लहानशा वासरीला जन्म दिला आहे. तिचे नाव डॉ.अश्विन सोनवणे यांनी ‘गौरी’ ठेवले असून याचे फोटो देखील माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. डॉ.अश्विन शांताराम सोनवणे आपल्या परिवारात या नवीन सदस्याचे स्वागत केले आहे.