जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
कानळदा गावाने नेहमीच मला मताधिक्य मिळवून दिले असून त्यामुळे मी सदैव कानळदा गावाचा ऋणी राहील. ग्रामस्थांची व कार्यकर्त्यांची भक्कम साथीमुळे सर्वांगीण विकास होत आहे. केवळ मतांपुरते राजकारण कधीही केले नाही. मंत्रीपदाचा बडेजावपणा कधीही मिरविला नसून शेतकऱ्यांचे कायम हितच साधण्याचा प्रयत्न केला आहे. जाती-पातीच्या राजकारणापेक्षा नेहमीच संपर्क, जनतेचे सुखं – दु:ख व गावाचा विकास याच कामांना महत्व दिले आहे. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कानळदा येथे विकास कामांचे लोकार्पण प्रसंगी जाहीर सभेत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला.
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, कानळदा व परिसरात लहान मोठे पुलांसह रस्त्यांचे जाळे उभारले असून श्वास्वत विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. कानळदा ते दुधमळी तसेच मोख्याची वाट या शेतकऱ्यांच्या रस्त्यांना तसेच युवकांसाठी प्रस्ताव सादर केल्यास अद्यावत अशी व्यायामशाळा बांधकामाला मंजुरी देणार असल्याची ग्वाही दिली. तसेच जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, विधान सभाक्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन ग्रा.पं. सदस्य जगदीश सपकाळे यांनी केले. आभार उपसरपंच अन्ना सपकाळे यांनी मानले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
मा. शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य, प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, उपसरपंच अन्ना सपकाळे, ग्रा.पं. सदस्य सुकलाल सातोटे, जगदीश सपकाळे,नवल बाविस्कर, विनोद सपकाळे, मोतीलाल सपकाळे, मोतीलाल सपकाळे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे , तालुका प्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख नाना सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, कैलास चौधरी, पंकज पाटील, प्रमोद सोनवणे, किटूनाना चौधरी. दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, रवी कापडणे, विधान सभाक्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,शेतकी संघाचे अर्जुन पाटील, गजानन सोनवणे, सुरेश पाटील, जितु पाटील, स्वप्नील परदेशी, उपतालुका प्रमुख राजू पाटील, युवासेनेचे रामकृष्ण काटोले, अजय महाजन, आबा माळी , परिसरातील सरपंच , विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कानळदा येथे मंजूर सर्वसामावेशक विकास कामे अशी
कानळदा येथे पर्यटन योजनेअंतर्गत कण्वआश्रम येथे भाविक भक्तांच्या सोयी सुवेधेसाठी – ६ कोटी २० लक्ष, लिधुर ते कानळदा रस्त्याचे डांबरीकरण – ४ कोटी २५ लक्ष , प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम – ०२ कोटी ५० लक्ष, कानळदा ते दोनगाव रस्ता डांबरीकरण – ८० लक्ष, वडनगरी ते कानळदा खडीकरण – ४० लक्ष, मागासवर्गीय वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधकाम – ४० लक्ष व पेव्हिंग ब्लॉक बसवणे – १० लक्ष, गाव ते मोख्याची वाट रस्ता खडीकरण – २० लक्ष, स्मशानभूमी पोहोच रस्ता काँक्रिटीकरण व संरक्षक भिंत – २० लक्ष , प्लॉट रस्ता कॉंकटीकरण – १० लक्ष भादोबा प्लॉट परिसरात संरक्षण भिंत बांधकाम व काँक्रिटीकरण २० लक्ष, एकलव्य सभागृह बांधकाम – १० लक्ष, गावठाण २ मधील ट्रान्सफार्मर – २२ लक्ष, सर्वसमावेशक अश्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले