जळगाव मिरर / १९ एप्रिल २०२३
शहरापासून जवळ असलेल्या कुसूंबा शिवारात कुलर फॅक्टरीतून चार कुलर व सिलिंडर लांबवणार्या कुसूंब्यातील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. धनराज अवदेश पासवान ( वय १९), विपुल प्रकाश पाटील (वय २२), निखील उत्तम धनगर (वय १९) सर्व रा. कुसुंबा ता. जळगाव अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी केली. चोरट्यांकडून 14 हजार रुपये किंमतीचे चार कुलर व दीड हजार रूपये किंमतीचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.