जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२३
राज्यातील पुणे शहराला विद्येचे माहेर घर असे म्हटले जात पण याच विद्येच्या माहेर घरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडणारी घटना कोथरूड परिसरात घडली आहे. एका तीन वर्षीय मुलीने पालकाने शिक्षकाबाबत जे सांगितले ते धक्कादायक होते. त्यानंतर पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे.
कोथरूड परिसरातील एका नामांकित शाळेत तीन वर्षाची मुलगी शिक्षण घेते असून ‘टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का, तुला मेणबत्तीचे चटके देईन, आणि घरच्यांना सांगायचे नाही’ असे म्हणतात. अशी तक्रार या चिमुरडीने वडिलांकडे केली होती. त्यानंतर वडिलांनी थेट कोथरूड पोलीस ठाण्यात ४० वर्षीय शिक्षिके विरोधात भादवी कलम 323, 506, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 36 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांढरे अधिक तपास करत आहेत.