जळगाव मिरर | १ जुलै २०२३
पाचोरा शहरातील वृंदावन सीटीत घरांचे बांधकाम सुरू असतांना भडगाव तालुक्यातील नालबंदी येथील २७ वर्षाच्या गवंडी काम करणाऱ्या मजूरास इलेट्ररीक मोटारीचा शॉक लागल्याने जागेवर मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील ठेकेदार भरत चौधरी यांची बांधकाम साईट शहरातील वृंदावन सीटीत सुरू असून त्यांचेकडे नालबंदी ता. भडगाव येथील भरत इंदल चव्हाण (वय – २७) हा गवंडी गेल्या पाच वर्षांपासून गवंडी काम करत होता. ३० जुन रोजी शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घराचे बांधकाम करीत असतांना त्या ठिकाणी इलेक्ट्रीक मोटार असल्याने ती बाजूला करत असतांना मोटारीची वायर लिकेज असल्याने भरत चव्हाण यांना शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचे पाश्चात्य आई, दोन भाऊ, तीन लहान मुले, दोन बहिणी असा परिवार असून त्यांची पत्नी गेल्या तीन दिवसांपूर्वीच प्रसुती झाली होती. भरत चव्हाण यांचे अकस्मात मृत्यूने नालबंदी तांड्यावर शोककळा पसरली आहे.