जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
मुलांना दुचाकीवरुन कॉलेजमध्ये घेवून जात असलेल्या शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) यांना अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मिल) याने रस्त्यात अवून चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागितली. ही घटना शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास अक्सा नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अक्सा नगरात अकबर शेख अब्बास हा तरुण वास्तव्यास आहे. शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरुन मुलांना घेवून इकरा कॉलेज येथे घेवून जात होते. यावेळी अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मील, याने शेख अकबर यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत दोन लाखाची खंडणी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही एक कारण नसताना अजिज याने चाकू भिरकावून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक संजय पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत.