जळगाव मिरर / ४ एप्रिल २०२३ ।
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनासह हाणामारीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असतांना दिसून येत असले तरी या घटना कुठल्याहि प्रकारे थांबण्याचे नावच घेत नाही आहे. एका नवऱ्याने संतापाच्या भरात असतांना दुपाच्या २ वाजेच्या सुमारास पत्नी झोपेत असतांना पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने धरणगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.येथे संतोष आखडू भिल हे आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षापासून पती व पत्नीमध्ये वाद सुरु असल्याने पती हे नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीपासून वेगळा राहत होता. दि. ३ एप्रिल रोजी भरदुपारच्या २.३० वाजेच्या सुमारास पत्नी मीराबाई भिल (वय 55) हे झोपलेले असतांना पती संतोष हा पत्नीच्या घरी येत पुन्हा वाद सुरु झाल्यानंतर पत्नी झोपलेले असतांना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने पत्नी पूर्णपणे भाजली गेल्याने त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला तर यावेळी पती संतोष देखील थोड्या प्रमाणात भाजला गेला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.जिभाऊ पाटील हे करीत आहेत.