जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२६
आतेबहिणीच्या कुटुंबाकडे पैसे आहेत, तिच्या पतीला ड्रग्स प्रकरणात अडकवून आपण पैसे कमवू शकतो, असा प्लॅन रचुन दुचाकीत ड्रग्स ठेवल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेने संशयिताचा हा प्लॅन फसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवकॉलनी परिसरात मंगळवारी दि.२९ जुलै रोजी पहाटे रामानंदनगर पोलिसांना कल्पेश सतीष रायसिंग (वय २६, रा. मु.पो भोदणी वालकी, ता. चोपडा) याच्या संशयित हालचाली लक्षात आल्या. त्याची चौकशी केली असता त्याच्या दुचाकीच्या सीटखाली ड्रग्स आढळुन आले होते. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताची पोलिसांनी विश्वास घेऊन चौकशी केली असता त्याचा नातेवाईक जतीन रवींद्र सैंदाणे (वय ३६, रा. नांदेड ता. धरणगाव) हा त्याला भेटण्यासाठी १५ जुलै रोजी अमळनेर येथे भेटायला आला होता. तेव्हापासून तो वारंवार जळगाव येथे हॉटेलवर जेवण करण्याचा आग्रह करत होता. त्यानुसार मंगळवारी जळगाव येथे जेवणासाठी संशयित कल्पेश आला होता. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी अडवून मला पकडले व त्यांना माझ्या गाडीच्या सीटखालून एमडी पावडर मिळुन आली व मला अटक केली. सीटखाली एमडी पावडर कशी हे मला माहित नाही, असे संशयिताने पोलिसांना सांगितले.
कल्पेश याचा नातेवाईक असलेला जीतन सैदांणे हा शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने कर्जबाजारी झाला झाला आहे. तसेच त्यांस एमडी ड्रग्ज पावडर सेवन करण्याची सवय आहे. त्यानेच पोलिसांना गोपनीय माहिती कळविली होती, की आज अमळनेर येथुन एक दुचाकीच्या सीटखाली एमडी पावडर विक्री करण्यासाठी जळगाव येथे येणार आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचा त्याच्यावर संशय बळावला.
या गुन्ह्याच्या तपासात जतीन सैंदाणे तसेच चंदन वानखेडे यांना आज न्यायालयात हजर केले असता ५ ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागी पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनान वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंदनग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तपासी अधिकारी पोउपनि संजय तडवी, रामानंदनग पोलीस ठाण्याचे तसेच एलसीबी जळगाव व रामानंदनगर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकार व अंमलदार यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास कर चांगली कामगिरी केली.




















