जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४
भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार केला. मात्र पीडीतेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटूंबियांना सांगितली नाही. पीडीतेचे पोट दुखू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घडला प्रकार समोर आला. याप्रकरणी अज्ञात प्रवाशाविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून भुसावळ येथील सतरा वर्षीय तरुणी सुरत जाण्यासाठी निघाली, सरत गाडीतून प्रवास सुरू केला. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यावर पीडीता शौचास गेली असता, तोंडाला मास्क लावून एक युवक शौचालयात शिरला. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याबाबत मुलीने काहीही माहिती तिच्या आई-वडीलांना दिली नाही. मात्र आता सहा महिन्यानंतर मुलीच्या पोटात दुखी लागल्याने सुरत येथील शासकीय रुग्णालयात तपासणीला नेले असता, त्या मुलीच्या पोटात गर्भ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे मुलीकडे पालकांनी चौकशी केल्यावर तिने भुसावळ-सुरत गाडीत अत्याचार झाल्याची कबुली दिली. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तोंडाला मास्क बांधलेल्या व्यक्ती विरूध्द खटोदरा (जि. सुरत) येथील पोलिस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल केला. तेथून हा गुन्हा लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करीत आहे.