मेष : आज आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही धैर्य कायम राखाल. आरोग्यावर जास्त खर्च होईल. कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. बेकायदेशीर कामात रस घेतल्याने अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात अधिक गंभीर मूल्यमापनाची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधूर राहील. सौम्य हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.
वृषभ : आज भावनेची आहारी जावून कोणतेही निर्णय घेवू नका, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत झालेल्या बदलाचा तुमच्यासह कुटुंबावर सकारात्मक परिणाम होईल. चुकीच्या वादात वेळ वाया घालवू नका. ज्येष्ठांच्या सहवासात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. व्यवसायात आज काही सकारात्मक उपक्रम सुरू होऊ शकतात. घरातील छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य चांगले राहिल.
मिथुन : आज आत्मचिंतनामध्ये काही काळ व्यतित करा. अफवांवर लक्ष देऊ नका. धार्मिक कार्यातील सहभागाने तुम्हाला मनशांती लाभेल. विद्यार्थी अभ्यासाकडे योग्य लक्ष देतील. महत्त्वाच्या कामात काही अडथळे येतील. समस्यांना घाबरण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींची स्वतः काळजी घ्या.
कर्क : ग्रहमान तुम्हाला प्रत्येक परिस्थितीशी लढण्याचे बळ देत आहे. इतर लोकांच्या चर्चेत अडकू नका आणि तुमचा निर्णय सर्वोपरि ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कराल. सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेवू नका. इतरांच्या समस्यांमध्ये अडकून तुम्ही वैयक्तिक काम खराब कराल. आरोग्य चांगले राहील.
सिंह : आज मागील काही काळापासून सुरु असलेली समस्या दूर होईल. अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. दैनंदिन कामांतूनही आराम मिळेल. किरकोळ कारणांतून घरातील वातावरण खराब होऊ शकते. मुलांशी योग्य संवाद साधा. व्यवसायातील बहुतांश कामे सुरळीतपणे पार पाडाल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.
कन्या : आज आर्थिक नियोजनाशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित करा. धावपळीपासून लांब राहात निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ व्यतित करा. इतरांवरील अतिविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. शेजार्यांशी वाद टाळा. व्यवसायात कोणतेही नवीन काम किंवा योजना आज सुरु करु नका. कुटुंबात सुसंवाद राखला जाईल. खोकला, ताप, सर्दी यासारख्या समस्या जाणवू शकतात.
तूळ : आर्थिक बाबींशी संबंधित परिस्थिती काहीशी सामान्य असेल. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही रुची वाढेल. काही लाभदायक योजनांबाबत भावासोबत किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा होऊ शकते. तणावामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. घर आणि कुटुंबाला प्राधान्य देऊ शकता. थकवा जाणवेल.
वृश्चिक : आज घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा. कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही केलेले नियमही योग्य असतील. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येष्ठाच्या आरोग्याशी संबंधित समस्या जाणवेल. व्यावसायिक कामात गाफील राहू नका. जोडीदाराचा तुम्हाला भावनिक पाठिंबा तुमच्या कामाच्या क्षमतेला नवी दिशा देईल. आरोग्य चांगले राहिल.
धनु : आज आर्थिक संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. तुमच्या आवडीच्या कामात थोडा वेळ व्यतित करा. कोणीतरी तुमच्या भावनिकतेवर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुमचा कोणीतरी गैरफायदा घेवू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने वेळ सामान्य राहील. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. आरोग्य चांगले राहिल.
मकर : आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवतील. महत्त्वाची कामे दिवसाच्या सुरुवातीला पूर्ण करा. चर्चेत अधिक वेळ वाया घालवू नका. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. घर आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ व्यतित कराल.
कुंभ : आजचा दिवस थोडा संमिश्र आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जवळच्या नातेवाईकासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील. परस्पर संबंध सुधारतील. काहीवेळा तुमची अति-शंका इतरांना त्रासदायक ठरु शकते. विचारांमध्ये लवचिकता ठेवा. विद्यार्थी अभ्यासाबाबत निष्काळजी राहतील. कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.
मीन : तुम्ही कुटुंबासोबत काही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. घरातील वातावरण सकारात्मक राहील. मुलांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्याने मनःशांती मिळेल. सर्व प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्ही केलेले व्यावसायिक बदल योग्य असतील. आरोग्य चांगले राहील.