अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतेलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अवघ्या दीड महीन्यांत गुन्हेगारांवर अतिशय कडक कारवाई करून अमळनेर पोलीसांची सिंगम वृत्ती दाखवून दिली आहे. यामुळे अमळनेरकरांचा पोलीसांप्रतीचा विश्वास व प्रेम दृढ झाले आहे. अमळनेरच्या जनतेकडून त्यांची प्रशंसा होत आहे.
याची दखल जळगाव जिल्हा पोलीस दलाने देखील घेतली असून जळगाव जिल्हा पोलिस प्रमुख पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी केलेल्या MPDA च्या कारवाई बाबत त्यांचा त्यांच्या टिमसह प्रशंसापत्र देवून गौरव केला आहे.
यात अमळनेरचे पोलीस हेड काॅन्स्टेबल किशोर पाटील, रविंद्र पाटील, दिपक माळी, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे यांचाही मा.पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तिपत्रक देवून गौरव केला आहे.
