मेष : ग्रहस्थिती काही प्रमाणात फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहेत. या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. आजचा बहुतांश वेळ घर-कुटुंब आणि नातेवाईकांसोबत व्यतित कराल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. अन्यथा विश्वासघात होईल. व्यवसायिक कामे आज जैसे थे राहतील. आरोग्य चांगले राहिल.
वृषभ : आज तुमची अभ्यासात विशेष रुची राहील. जुन्या समस्येवर उपाय शोधाल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचे पालन करा. धोकादायक कामांपासून दूर राहा. जवळच्या नातेवाईकांशीही वाद होऊ शकतात. कुणाच्या तरी हस्तक्षेपाने वादावर पडदा पडू शकतो. नोकरीच्या ठिकाणी धैर्याने आणि आत्मविश्वासाने रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात चांगला समन्वय राखाल. दैनंदिन दिनचर्येसह खाण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळच्या नातेवाईकाशी किंवा मित्राशी मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत आणि काही बदल करण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधूर राहील. तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका.
कर्क : आज कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला महत्त्वाची सूचना प्राप्त होऊ शकते. इतरांचा सल्ला आज तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो त्यामुळे भविष्यासाठी नियोजन करताना इतरांपेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. व्यवसायात मार्केटिंगशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराचा सल्ला तुमच्या सोबत राहील. बदलत्या वातावरणामुळे अशक्तपणा, थकवा यासारखी परिस्थिती निर्माण होईल.
सिंह : आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या शुभ आहे. वैयक्तिक कामात यश लाभल्याने मनःशांती मिळेल. कठीण कामे दृढनिश्चयाने पूर्ण करण्याची क्षमता ठेवा. आत्मविश्वासाने काम करा, यश नक्की मिळेल. इतरांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडणार नाही, याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
कन्या : आजचा थोडा वेळ तुम्ही आत्मनिरीक्षण केल्यास तुम्हाला खूप मनःशांती मिळेल. अनेक समस्यांवर मात कराल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी यश घेऊन येणार आहे. इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहण्याऐवजी, स्वतःवर विश्वास ठेवा; ते तुम्हाला अधिक यश देईल. कुटुंबातील सदस्य एकमेकांशी परिपूर्ण सुसंवाद साधतील. महिला त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहतील.
तूळ : आज तुमचा आध्यात्मिक कार्यक्रमातील सहभागाने मनशांती लाभेल. कोणाला न विचारता सल्लाही देऊ नका. विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता भटकण्यात आपला वेळ वाया घालवतील. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कमी वेळ द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहिल.
वृश्चिक : आज घराच्या नूतनीकरणासंदर्भात महत्त्वाच्या योजना असतील. मालमत्तेबाबत किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर कुटुंबातील सदस्यांमध्ये असणारा कोणाच्या तरी हस्तक्षेपाने दूर होऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचा किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल; परंतु अनोळखी व्यक्तींकडून कोणताही व्यवहार किंवा सल्ला घेणे टाळा. सध्या कार्यक्षेत्रात काही चांगले परिणाम मिळणे शक्य नाही, सध्या कामाशी संबंधित काही धोरणे बदलण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते सकारात्मक आणि सहकार्याचे असेल. बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता.
धनु : आज कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. तरुणांनी आपल्या करिअरबाबत अधिक जागरूक असले पाहिजे. आज काही नोकरदारांमुळे कामाच्या ठिकाणी तणाव असू शकतो. अति कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तणावाचा आरोग्यावरही परिणाम होवू शकतो.
मकर : आज कौटुंबिक वाद दूर होऊन घरात शांतता राहील. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. जवळच्या मित्राचे सहकार्यही तुमचे आत्मविश्वास टिकवून ठेवेल. मुलांच्या करीअरसंदर्भात निर्णय घेण्यात घाई होऊ शकते. व्यवसायातील कामे सध्या मंद असू शकतात. घर आणि कुटुंबात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. आरोग्य उत्तम राहिल, असे श्रीगणेश सांगतात.
कुंभ : आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. आज तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त राहू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात निश्चित धोरण तयार करून काम करा.पती-पत्नी एकमेकांशी असलेला संवाद चांगल्या प्रकारे समजून घेतील. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो.
मीन : आज तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल. कोणतेही कठीण काम कठोर परिश्रमाने पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. जवळच्या मित्रांवर आणि नातेवाईकांसोबतचे नाते खराब करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत करेल.