जळगाव मिरर | २ मार्च २०२४
राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत आतापासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहे. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच रत्नागिरीमध्ये पण आम्हीच असे होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचे आहे का? अशा शब्दात रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
रायगड लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा वर तुम्ही सांगाल आम्हीच तर असे होत नाही. रत्नागिरीची जी जागा आहे ती शिवसेनेची आहे. तुम्हाला भाजपला सर्व पक्षाला संपवून एकट्याला जिवंत राहायचे का? असा सवाल उपस्थित करून शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली आहे. आम्ही दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ, आणि माझ्याला हात नका लावू, असं होता कामा नये, असा टोला देखील रामदास कदमांनी भाजपला लगावला आहे.
रामदास कदम म्हणाले की, आमच्या या भूमिकेमुळे युतीत अजिबात फूट पडणार नाही. प्रत्येकाला वाटते की, माझा पक्ष मोठा झाला पाहिजे. त्यामुळे असा विषय काढून प्रयत्न केला जातो. हळूच विचारून पाहू… जमले तर जमले… असा असा प्रकार केला जातो. याचा अर्थ माझे आहे ते माझेच आहे आणि तुझे आहे ते पण माझेच आहे. राजकारणात असे कधी होत नाही.
रामदास कदम म्हणाले की, रत्नागिरीची जागा ही शिवसेनेची आहे. आपण दोघे भाऊ, भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्या याला हात नको लावू. पण, असे होते नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरीचीदेखील जागा सोडणार नाही. ती आम्ही लढवणारच, आमच्या हक्काची आहे. आता जे खासदार विनायक राऊत आहेत. मागच्या वेळेला त्यांच्या प्रचार करता सावंतवाडी शेवटची प्रचार सभा मी घेतली होती.