मेष : आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. ग्रहस्थिती अनुकूल राहील. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांचे योग्य सहकार्यही लाभेल. घरामध्ये एखाद्या चांगल्या कामाची योजना असू शकते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायात आपली भूमिका महत्वपूर्ण असेल.
वृषभ : अध्यात्म आणि धर्मकर्मात रुची वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल. तुम्हाला तुमची प्रतिभा आणि क्षमता इतरांना दाखवण्याची संधी देखील मिळू शकते. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन : तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्याने तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळा. ताणतणावाचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
कर्क : ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही विशेष ध्येय गाठू शकाल. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो याची जाणीव ठेवा. आपल्या वर्तनावर विचार करणे आवश्यक आहे. आज तुम्ही मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये व्यस्त राहू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
सिंह : आज ग्रहांची स्थिती तुम्हाला स्वतःबद्दल विचार करण्याचा आणि स्वतःसाठी काम करण्याचा संदेश देत आहे. यावेळी घेतलेला कोणताही विवेकपूर्ण निर्णय नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. अहंकार आणि क्रोध टाळा. तुमच्या जवळच्या लोकांशी संबंध खराब होऊ शकतात. जमिनीशी संबंधित कामात जास्त अपेक्षाक ठेवू नका.
कन्या : आज फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका कारण तुम्हाला काही महत्त्वाची सूचना मिळू शकते. ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढवण्यास मदत करेल. भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी काही वाद होऊ शकतात. व्यापारातील सध्याची कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
तूळ : : संपर्कक्षेत्रात वाढ होईल. न्यायालयात खटला प्रलंबित असल्यास, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मुलांसोबत आणि कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या यशाचा मत्सर करून काही लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावध रहा.
वृश्चिक : : तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाला सांगू नका. गुप्तपणे कोणतीही गोष्ट केल्याने तुम्हाला यश मिळू शकते. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रांची गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यावसायिक कामे व्यवस्थित सुरु राहतील. तणावाचा कुटुंबावर परिणाम होऊ देऊ नका.
धनु : काही खास लोकांशी संपर्क केल्याने तुमची विचारशैलीही सकारात्मक बदलेल. कामाबद्दलचे समर्पण तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका आणि तुमच्या योजना जाहीर करा. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता राखणे महत्त्वाचे.
मकर : आज मागील काही दिवस सुरु असणारी चिंता दूर होऊ शकते. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून योग्य तोडगा काढता येईल. सकारात्मक विचार तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करेल. आर्थिक प्रश्नी रागावण्याऐवजी शांततेने परिस्थिती हाताळा. व्यवसायात कामाचा ताण आणि जबाबदारी वाढू शकते.
कुंभ : आज इतरांना मदत कराल. यामुळे मानसिक दिलासा मिळेल. तुमच्या नम्र स्वभावामुळे नातेवाईक आणि समाजातही आदर वाढेल. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : आज वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचा विचार असेल. मेहनतीच्या जोरावर अवघड काम साध्य कराल. संवादातून अनेक समस्या सोडवाल. काहीवेळा मनाप्रमाणे गोष्टी होणार नाहीत तेव्हा निराश न होता धीर धरा. तरुणांना रोजगाराच्या संधी उपल्बध होतील.