जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४
भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात गेल्या आठवड्यापासून मंदिर व तीर्थ स्थळ स्वच्छता अभियान राबविण्यात ची मोहीम हाती घेतली आहे यात जळगाव शहरात देखील अनेक मंदिरे व धार्मिक तीर्थस्थळाची स्वच्छता व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अभियान राबविले जात आहे यात शहराच्या अभियानासाठी चार माजी नगरसेवकांची नियुक्ती केली आहे.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नडा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील मंदिरे व धार्मिक तीर्थस्थळ स्वच्छता अभियानासाठी जळगाव मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांची अभियान संयोजक म्हणून तर सहसंयोजक सुनील खडके, राजेंद्र घुगे पाटील, मयूर कापसे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र महानगर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक उज्वलाताई बेंडाळे यांनी दिले आहे. या निवडीबद्दल जळगाव लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेछ्याचा वर्षाव होत असून आगामी काळात हे अभियान जळगाव शहरात यशस्वी करणार असल्याच्या विश्वास डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.