जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पार्श्वभूमीवर देशभरात तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात देखील भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह जळगावात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
जळगाव शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर व सिद्धेश्वर महादेव मंदीर या परिसरात आज दि.१९ रोजी मंदीर व धार्मिक स्थळ स्वछता अभियांनांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.विकास पाटील, शैलेंद्र सोनवणे, मनपा कर्मचारी फायर विभाग कर्मचारी व पदाधिकारी व कार्यकर्त्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.