जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात नुकतेच ग्रामपंचायतीची धामधूम सुरु असून निकाल देखील जाहीर झाला आहे. यातील करंज ग्रामपंचायतमध्ये नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांनी आपला गुलाल उधळला असून त्यांनी नुकतेच फुपणी गावाचे माजी सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
यावेळी जळगाव पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.शितल कमलाकर पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच व सर्व ग्रा.पं.सदस्यांचे औक्षण केले. नवनिर्वाचित सरपंच समाधान सपकाळे व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सपकाळे,कुमार पाटील,दिगंबर सपकाळे,बाळू धनगर,वासू सपकाळे,सुभाष भाऊ सपकाळे या सर्वांचा डॉ. कमलाकर पाटील यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. डॉ.कमलाकर पाटील यांनी सर्वांना त्यांच्या भावी कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.