जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरातील मुख्य महामार्गावर अपघाताची घटना नियमित घडत असतांना आज पुणे शहरातील चांदणी चौकात भरधाव डंपरने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. या रिक्षेत शाळकरी विद्यार्थी होते, ते सर्व विद्यार्थी एमआयटी ग्रुप स्कूलचे असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातात रिक्षेतील ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बेंगळुरू महामार्गावरून शाळा सुटल्यानंतर ही रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन जात असतांना मार्गावरील भुयारी मार्गातील रिक्षा आणि डंपरची धडक झाली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमी झालेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका विद्यार्थ्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.