
जळगाव मिरर । २७ मे २०२३

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या महिला आमदार मतदार संघातून घरी जात असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या गाडीला भरधाव डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने त्या बालंबाल बचावल्या आहेत. जळगाव तालुक्यातील चोपडा जळगाव रस्त्यावर करंज गावा जवळ शनिवारी हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील आमदार लता सोनवणे हे त्यांचे पती माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनावणे यांच्यासोबत वाहनाने चोपडा कडून जळगाव कडे येत होत्या. चोपड्या हून जळगाव कडे येत असताना जळगाव कडून चोपडा कडे जाणाऱ्या डंपरने आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा गाडीला धडक दिली.मात्र दैव बलवत्तर म्हणून केवळ मुका मार लागल्याने दोन्ही जण बचावले आहेत. या घटने नंतर पोलिसांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघाताबाबत माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी माहिती दिली आहे. या अपघातात मुका मार लागला असून केवळ नशीब चांगले म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी दिली आहे





















