जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका ७४ वर्षीय वृद्धाचा तीव्र विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि १३ रोजी सायंकाळी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगर परिसरातील रहिवासी रतन निना साळुंखे (वय ७४) याना उभ्या स्वरूपात असलेल्या टेबल फॅन मधून विद्युत प्रवाह उतरून त्यांना जोरात धक्का बसल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले असता. त्यांना तपासून सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले.
रतन साळुंखे हे पार्टिशनच्या घरात एकटेच राहत होते. त्यांचा इतर परिवार त्यांच्या घराच्या समोरच राहतो. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास ते पंखा सुरू करण्यासाठी उभे राहिले. त्याच वेळेला पंख्याला हात लावताच त्यांच्या हातात वीजप्रवाह उतरला आणि पंख्यासहित ते चिटकले व खाली कोसळले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. शेजारच्या नागरिकांना कळताच कुटुंबीयांनी व नागरिकांनी तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या ठिकाणी त्यांना तपासून सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना असा परिवार आहे.