जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
भारत-पाक सीमेवर कुपवाडा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्स सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखं भारतामध्ये आणली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लगले आहेत.
तर “शिवछत्रपती जेवढे धार्मिक तेवढेच विज्ञाननिष्ठ होते. महाराजांनी धर्म किंवा पंथ यांचा विचार न करता स्वराज्य स्थापन केले. छत्रपती म्हणजे नियतीला पडलेले सुंदर स्वप्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प लावले. आम्ही जमेल तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करत असतो. युनोस्कोमधे अकरा गड किल्ल्यांची नोंद झाली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दांडपट्टा हा राज्याचा खेळ म्हणून जाहीर केलाय”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.