जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अतिउत्साही लोकांनी एक दिवसाआधीच ३१ डिसेंबरचा आनंद घेत असतांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने भर रत्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स चारचाकीने उडवीत तीन दुचाकी व एका चारचाकीला जबर धडक दिली आहे. यात एका पत्रकारचे परिवार थोडक्यात बचावले आहे. यानंतर पोलिसांनी या चारचाकी चालकाला घेवून जिल्हा पेठ पोलिसात आणले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे जात असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक प्रेमराज सुभाषराव वाघ हा मद्यधुंद अवस्थेत असतांना आकाशवाणी चौक परिसरातील बॅरिकेड्स चारचाकीने उडवत तीन दुचाकींसह एका चारचाकीला धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले असून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्यास पकडले. ही घटना दि.३० रोजी रात्री रात्री सव्वानऊ वाजता घडली. शनिवारी रात्री लिपिक कारमधून (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होता. वाहतूक शाखेच्या वतीने आकाशवाणीनजीक बॅरिकेड्स लावले होते. या वेळी प्रेमराज याने बॅरिकेड्सला उडवून पुढील वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे हे जखमी झाले. यावेळी या लिपिकाने घटनास्थळी असलेल्या पोलिसांशी देखील हुज्जत घातली होती.
पत्रकाराचे परिवार थोडक्यात वाचले
जळगाव शहरातून महाबळकडे दुचाकीने जाणारे पत्रकार आकाशवाणी याठिकाणाहून जात असतांना मागून भरधाव चारचाकीने याच्या दुचाकीला कट मारला पण पत्रकाराच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच दुचाकीसह परिवाराला रस्त्याच्या कडेला उडी मारण्यास सांगितले त्यामुळे परिवार सुदैवाने वाचले आहे.