जळगाव मिरर । २ फेब्रुवारी २०२३।
अगदी १० दिवसावर येवून ठेपलेला “व्हॅलेंटाईन डे” हा दिवस जगभर जागतिक प्रेम दिवस १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. जागतिक प्रेमदिवस हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा सोहळाच असतो. पण हाच दिवस अल्पवयीन ३ मुलीनी जळगावातील लव्ह गल्लीत आजच साजरा करीत असतांनाच जिल्हा पोलिस दलाचे निर्भया पथक दाखल झाल्याने प्रेमीयुगुलांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेने पुन्हा एकदा जळगावातील हि ‘लव्ह गल्ली’ चर्चेत आली आहे.
काय घडली घटना
महाविद्यालय आवारात टवाळखोरांकडून उच्छाद मांडला जातो. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींची त्यांच्याकडून छेडछाडीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे शहरात निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आज सकाळी गस्तीवर असतांना त्यांनी शहरातील जी.एस.ग्राऊडच्या समोरील ‘लव्ह’गल्लीत जात असताच या ठिकाणी अनेक तरूण तरुणी अश्लील चाळे करीत असतांना दिसून आले. यावेळी लागलीच निर्भया पथकातील महिला पोलिसांनी यातील काही मुलीना थांबविले, या मुलीना थांबवून पोलिसांनाच धक्का बसला. अवघ्या ७ वी व ८ वी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली प्रियकरासोबत याठिकाणी चाळे करीत असतांना सापडल्याने सदर ठिकाणाहून तरुणांनी पळ काढला पण अल्पवयीन मुली पकडल्या गेल्या, त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता, त्यांनी महिला पोलिसांना बनवाबनवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यातील एका मुलीने उत्तरे दिले कि, माझा भाऊ आला होता. काही वेळाने महिला पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पालकांना फोन केला असता, ते पालक म्हणाले कि, मुलीला भाऊच नाही. पोलीस अजून बुचकळ्यात पडले. त्यानंतर त्या मुलाला फोन करून घटनास्थळी बोलविले असता, मग सर्व काही सत्य बाहेर आले. अवघ्या ७ वी ते ९ वीच्या अल्पवयीन मुलीना निर्भया पथकातील महिला कर्मचारीनी समज देत सोडून दिले.
“लेडी सिंघम’चा वचक कायम !
शहरातील विविध भागात तरुण-तरुणीचे घोळके तासनतास बसून त्याठिकाणी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असतो. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे निर्भया पथक प्रत्येक शाळा, महाविद्यालय, मेहरूण तलाव परिसर, कोल्हे हिल्स परिसर भागात नेहमी गस्त घालीत असून याठिकाणी होत असलेले प्रकार बंद करण्यास “लेडी सिंघम’चा पुढाकार आहे तर त्यांचा वचक हि सध्या बसू लागला आहे. आज झालेल्या कारवाईत निर्भया पथकात पो.कॉ. रंजना संजय बत्तीस, ममता तडवी, उज्ज्वला पाटोळे, राजश्री पवार, कविता गवई यांचा सहभाग होता.