जळगाव मिरर | ५ सप्टेबर २०२४
राज्यात लाडकी बहिण योजना सुरु केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील सागर पार्क येथे भव्य कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहराला १०० कोटी निधी देण्याचे जाहीर केले होते. आता हा निधी शहरातील भाजपच्या नगरसेवक व मंडळ अध्यक्ष यांच्याशी हितगुज करून हा निधी शहरातील प्रत्येक प्रभागात समसमान खर्च व्हावा असे नियोजन करण्यात यावे अशी मागणी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
जळगाव शहरातील सागर पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार, जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभेत १०० कोटी निधी देत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा निधी शहरातील प्रत्येक प्रभागात समसमान खर्च करण्यात यावा जेणेकरून शहरातील प्रत्येक प्रभागात विकास मोठ्या प्रमाणत होवू शकतो. मंत्री गिरीश महाजन यांनी यावर विचार करून मनपातील भाजपच्या नगरसेवकाशी मंडळअध्यक्ष यांच्याशी हितगुज करून ज्या प्रभागात आजवर विकासकामे झाले नसेल त्याठिकाणी देखील हा निधी वापरण्यात यावा जेणेकरून शहरातील विकासाला चालना मिळेल अशी मागणी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे.