जळगाव मिरर | ३० जुलै २०२६
प्रत्येक माणसात काहींना काही गुण असतात आपल्याला काहींना काही चांगलं शिकून जातो. त्यामुळे आपण प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे असे प्रतिपादन जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले. त्या श्री पंत मंदिर येथील पंत अवधूत मठी येथे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. नगरसेवक पियुष कोल्हे व मंगला चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक पियुष कोल्हे मंगला चौधरी,कल्पेश सोनवणे, डॉ विनय चांडक आदी उपस्थित होते.तर

या कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी नामस्मरण, बोध सत्र महाआरती व शाळा क्रमांक तीनच्या आवारात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात कडुलिंब, चिंच, आंबा यासह आदी विविध झाडे लावण्यात आली. तर जळगाव मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी निरीक्षण गृह अधीक्षक रविकिरण अहिरराव, श्री पंतावधूत मठीचे अध्यक्ष सुधाकर मराठे, गोपाळ पाटील, सुपडू भिरूड, विलास चौधरी,राजेंद्र अहिरे, मनीष महाजन,मोहन कोळी, अनिल हळदे पद्माकर चौधरी, मारोती पेंटर, योगेश सुने आदी उपस्थितीत होते.
तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले.तर संजय अहिरे, जितेंद्र माळी,शशिकांत पाटील गौरव अहिरे,अनिल खोंडे,यांनी परिश्रम घेतले.





















