जळगाव मिरर | १० जुलै २०२४
अनेक वर्षांपासुन रमेश जेठानंद तेजवाणी (वय ५८), त्यांचा मुलगा दिपक रमेश तेजवाणी (वय २४, दोघ रा. सिंधी कॉलनी) हे महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहे. गुटखा विक्री करुन त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. या बाप-लेकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १ वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश जेठानंद तेजवाणी व त्यांचा मुलगा दिपक रमेश तेजवाणी हे दोघ बाप-लेक गेल्या अनेक वर्षांपासुन गुटख्याच्या व्यावसायात आहे. राज्यात गुटखा बंदी करण्यात आल्या पासून तेजवाणी पितापुत्राने तस्करीचा मार्ग अवलंबला होता. सन २०१९ पासून जिल्ह्याभरात गुटख्याची ने-आणसह विक्री करतांना पिता रमेश तेजवाणी याच्या विरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, मुलगा दिपक तेजवाणी याच्या विरुद्ध तब्बल ७ गुन्हे दाखल असूनही त्याच्या वागणुकीत फरक पडत नव्हता. पोलीस एमआयडीसी पोलिस ठाण्यात वारंवार दाखल होणारे गुन्हे, तक्रारी अर्जाच्या अधारे, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, डिवायएसपी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.
पोलीस अधीक्षकांकडे पाठविलेल्या प्रस्तावाच्या त्रुट्या आणि कायदेशीर बाबींची पुर्तता केल्यावर पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, युनूस शेख, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंडे, छगन तायडे, किरण पाटील यांच्या पथकाने तेजवाणी पिता-पुत्राला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांना मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथे सोडून देण्यात आले.