जळगाव मिरर | २० जुलै २०२४
जिल्ह्यातील रावेर व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करत चार जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १९ रोजी दिले तसेच भोलाणे (ता. जळगाव) येथील किरण श्रावण कोळी (वय २८) या आरोपीलाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्द करत त्याची ठाणे कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रस्ताव तयार केला होता.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या शेख तोसिफ शेख अफजल (२८, रा. रावेर); अयुब बशीर तडवी (५५, रा. कुसुंबा, ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (४३, रा. अटवाडे, ता. रावेर) व पिंपळगाव पोलिस ठाणे हद्दीतील मनोहर उर्फ मोहन उखडू कोळी (५५, रा. लोहारी, ता. पाचोरा) या चौघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. चौघांची मुंबई व ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, दि. २३ जानेवारी २०२२ ते ५ मार्च २०२३ दरम्यान किरण श्रावण कोळी याच्याविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच कारवाया केल्या आहेत. ‘हातभट्टी’ची दारू पाडणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या या आरोपीची पाच पैकी दोन गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता झाली आहे. अन् ती गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत, तसेच या आरोपीवर दोनदा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. या आरोपीकडून सातत्याने हातभट्टीची दारू विक्री होत असल्याने आणि कारवाई करूनही आळा बसत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी गंभीर दखल घेतली आणि एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १८ जुलै रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आरोपीला ताब्यात घेतले आणि ठाणे कारागृहात त्याची रवानगी केली आहे.