जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरातील अनेक कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसापासून अतीदुर्गंधी युक्त वास येत असल्याने राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर,महावीर नगर,सत्यम पार्क,राजमालती नगरसह कॉलनी परिसरातील नागरिक महिला व वयोवृध्द लोकांना श्वासनाचा खूप त्रास होत आहे. म्हणुन याबाबतची तक्रार घेऊन आज दि.१३ आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना देण्यात आले.
परिसरातील नागरिकांनी आरोग्य अधिकारी यांना भेटून होत असलेल्या या त्रास बद्दल चर्चा केली व यावर लवकरात लवकर तोडगा काढून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी असे आशयाचे निवेदन दिले जर 2 दिवसात यावर कुठलीही कार्यवाही नाही झाली तर सरळ जिल्हा दुध उत्पादक संघच्या गेट समोर परिसरातील नागरिकांचा वतीने तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांचा वतीने देण्यात आले यावेळी निवेदन देताना उपस्थित सामाजिक कार्यकर्ता विजय सुरवाडे, ऍडव्होकेट.निलेश जाधव, नितीन मोरे, शुभम घाटे, खुशाल सोनवणे, प्रतीक सपकाळे, आहे. तसेच प्रभागांतील नागरिक उपस्थीत होते.