जळगाव मिरर : १४ जुलै २०२३
जळगाव-एरंडोल महामार्गावर आज दुपारी पुन्हा एकदा ट्रक व चार चाकी चा अपघात झाला असून सदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यानजीक असलेल्या मुसळी फाट्याजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने चारचाकी क्रमांक एम.एच.१९बी.यु. १८४५ ला जोरात कट मारल्याने चार चाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपीजवळ जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
घटनास्थळी पाळधी महामार्ग पोलीस स्थानकाचे सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे, हवालदार संजय तेली, सलीम शेख, पाळधी महामार्ग पोलीस यांनी सदर कार मधील लोकांना बाहेर काढला डीपीपासून बाजूला करून व ट्रक व ट्रक चालक याला पारधी पोस्टचे कर्मचारी यांच्या ताब्यात पुढील कारवाई करणे सुरू आहे.