जळगाव मीरर | ७ मार्च २०२४
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सन्मानार्थ आणि महिला सक्षमीकरणाचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयात “वीरांगना” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रेल्वेच्या भुसावळ ‘डीआरएम’पदी प्रथमच महिला अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या तसेच रेल्वेसह मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या इति पांडे यासह प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या कन्नन व जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल या उपस्थित होत्या. तसेच जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, उद्योजिका शिल्पा जैन, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या विश्वस्त ज्योत्स्ना रायसोनी, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, मी स्वता: रायसोनी इस्टीट्युटमध्ये एक वीमेन एम्पावरमेंट लीडर म्हणून कार्यरत असतांना येथील विध्यार्थिनी, प्राध्यापिकाचे मेंटोरिंग करत त्यांना सपोर्ट, अप्रिशिएट, मोटिव्हेट व त्यांचे कौन्सिलिंग करत त्यांना पुढे नेण्याची जबाबदारी समजते. आजच्या जगात एका एम्पावरमेंट वीमेनने दुसऱ्या वीमेनला एम्पावरमेंट होण्यासाठी मदत करणे अत्यंत गरजेचे असून वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सशक्तिकरण किंवा महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे आणि वीमेन एम्पावरमेंट व महिला नेतृत्व वाढीमुळे आपले घर, संस्था व देश बळकट होतो तसेच जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिच्यातील नेतृत्व वाढीसाठी मदत करेल तर “विकसित भारत २०४७” मधील जो आपल्याला अपेक्षित असलेला समाज आहे तो नक्कीच निर्माण होईल, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या इति पांडे यांनी म्हटले कि, आज नागरी क्षेत्रात स्त्रिया अधिकारिणी बनून पुढे आल्या. शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत इ. विविध क्षेत्रांत स्त्रियांनी मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या स्वबळावर पटकावल्या अन् सर्वच पदावर महिला सक्षमतेने कार्यरत आहेत. शासकीय, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांत मिळालेल्या संधीचं सोनं करत कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्या मदत तर करतच आहेत, पण देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आयएएस, आयपीएस होऊन नागरी सेवा करणार्या कितीतरी स्त्रिया आपले कौशल्य देशासाठी अर्पण करीत आहेत. त्यामुळे उपस्थित विध्यार्थ्यांना आवाहन करत आपल्यातला आत्मविश्वास कसा मिळवता येईल, यासाठी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, मेहनत करण्याची तयारी ठेवा, नेहमी शिकत रहा, शिस्त पाळा, नियोजन करा, स्वतःवर विश्वास ठेवा, संयम बाळगा, सवयी बदला – आयुष्य बदलेल, यशासाठी वेळ निश्चित करा अशा टिप्स सागंत त्यांनी एक हजार मुलांमागे नउशे मुली असून अजूनही समाजप्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या कन्नन यांनी “यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही “ओव्हरटेक’ केले आहे. आपणही पुढे जायचे… या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने पंख दिले आहेत. नवयुगात ती व्यावसायिक होते आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देते आहे. मात्र यशस्वी स्त्रियांची संगत आणि सहवासावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चांगल्या, यशस्वी व आत्मविश्वास असलेल्या स्त्रियांच्या सहवासात जास्तीतजास्त काळ घालवता आला, तर त्यातून आपल्याला आत्मविश्वास मिळतो. नकारात्मक विचार आत्मविश्वास कमावण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र तो गमावण्यासाठी एखादा नकारात्मक विचारही पुरेसा ठरतो. अशा विचारांमुळे सर्व गुण अंगी असूनही यश मिळत नाही. त्यामुळे नकारात्मक विचार व ते पसरवणारे लोक यांच्यापासून नेहमी दूर राहावं असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. डॉ. गीता धर्मपाल यांनी म्हटले कि,अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले,पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा आदर्श घ्यावा तसेच भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला मोठे महत्व आहे. कुटुंबाला बांधणारी स्त्री ही देविसमान मानली जाते, याचा प्रत्यय जळगावमधील उद्योजक डॉ. भवरलाल जैन यांच्या ‘ती आणि मी’ आत्मचरित्रात येतो. जैन इरिगेशनचे नाव देशभर पोचलेले आहे. या उद्योगाच्या भरभराटीचे श्रेय डॉ. जैन यांच्या पत्नी कांताबाई यांना देतात. या यांच्या आत्मचरित्रात कांताबाइंचे चरित्र सामावले आहे.
भारतीय हिंदू कुटुंब, त्यातील नाती जपण्याची गृहिणीची जवाबदारी, विवाह संस्था, उद्योगातील चढ-उतार, याच्या अनुषंगाने पत्नीचे महत्व यात त्यांनी अधोरेखित केले आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर आभार प्रदर्शन कार्यक्रमात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी भारतीय परंपरेतील स्त्री-रूपाचे स्थान प्रेरणादायी असून भारतीय संस्कृतीची अभिजातता आणि एकात्मता भारतीय स्त्री मुळेच दृढ झाली असल्याचे म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर प्रा. श्रिया कोगटा, प्रा.ज्योती जाखेटे व “पिंक हॅट्स क्लब”ने समन्वय साधले तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विध्यार्थीनीना “वीरांगना” सन्मान प्रदान
मानसी दिलीप साळुंके (बीसीए), जास्वंदी शैलेश दहिभाते(बीसीए), रुचिया अतुल चौधरी(बीसीए), रुची शरद भाटिया (बीसीए), नुपूर चंद्रकांत जोशी (एमसीए), साक्षी विलास पाटील (बीसीए), इशिता संजय पाटील (बीसीए), आयुषी राजेश केसवानी (बीबीए), अनुष्का नरेंद्र अग्रवाल (एमबीए) सकीना मुर्तझा अमरेलीवाला (बीबीए), अनुष्का नरेंद्र अग्रवाल (एमबीए), देवयानी पाटील (बीटेक), भाग्यश्री दिलीप पाटील (बीसीए), अस्मिता किशोर पाटील(बीसीए), सरस्वती अनिल साहित्य (बीसीए), साक्षी हरिश्चंद्र गवळी(बीसीए), दिव्या शंकरलाल भगवानी (बीबीए), लक्ष्मी बाबुलाल मंधान (बीबीए), जान्हवी प्रदीप इंगोले (एआय अभियांत्रिकी), जयश्री ज्ञानेश्वर पाटील(संगणक अभियांत्रिकी), प्रतीक्षा प्रमोद पाटील(आयटी अभियांत्रिकी), विद्या मनोज बाविस्कर(संगणक अभियांत्रिकी), सानिक्षा प्रमोद पाटील(संगणक अभियांत्रिकी), अश्विनी चव्हाण(संगणक अभियांत्रिकी), गायत्री पाटील(संगणक अभियांत्रिकी), नंदिनी ठाकरे(संगणक अभियांत्रिकी), राजश्री पाटील(संगणक अभियांत्रिकी), चारुशीला पाटील(संगणक अभियांत्रिकी), साक्षी घोडके(संगणक अभियांत्रिकी), पूर्वा गुंजाळ(संगणक अभियांत्रिकी), पलक दिलीप पाटील(संगणक अभियांत्रिकी), वैष्णवी लक्ष्मण मराठे(संगणक अभियांत्रिकी), अक्षदा पाटील(एआयएमएल अभियांत्रिकी),