जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४
बाहेरगावी शिक्षण घेत असलेली मुले घरी आल्यामुळे शहरात त्यांच्या परिचयातील व्यक्तीकडे गेलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर वसुली अधिकारी चंद्रकांत इंगळे यांच्या घरावर पाच ते सहा जणांनी टोळक्याने हल्ला केला. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी त्यांच्या घराच्या खिडक्यांचे काचा फोडण्यासह दुचाकी, वाशिंग मशिन, खुर्च्छा, झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करून रोख सात हजार रुपये, सोन्याच्या चैनसह अडीच लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महावीर नगरात घडली. हल्लोखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर वसुली अधिकारी असलेले चंद्रकांत इंगळे यांचे शहरातील महावीर नगरमध्ये घर आहे. त्यांचे दोघ मुल बाहेरगावी शिक्षण घेतात, शुक्रवारी ते घरी आल्यामुळे शुक्रवारी रात्री इंगळे हे पत्नी अॅड. रेखा इंगळे यांच्यासह त्यांच्या परिचयातील रिंगरोडवरील रवींद्र वैद्य यांच्याकडे गेलेले होते. त्या वेळी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास एका गुलाबी रंगाच्या स्कूटरसह पाच ते सहा जण त्याठिकाणी आले. त्यांनी घराच्या कंपाऊंडमध्ये घुसून घरावर थेट हल्ला केला. घराच्या बाहेरील बोळमध्ये ठेवलेले वाशिंग मशिन उलटवून देत नुकसान केले. तसेच रेखा इंगळे यांची दुचाकी खाली पाडून नुकसान केले. मध्यरात्री इंगळे कुटुंबीय घरी आले त्या वेळी घरात तोडफोड केल्याचे दृष्य दिसले त्यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबियांना ते बघून काय करावे, हेच त्यांना काही वेळ समजले नाही, एवढा धक्का हा हल्ला पाहून त्यांना बसला होता. या प्रकरणी अॅड. रेखा इंगळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागर नामक व्यक्तीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.