जळगाव मिरर | २५ मे २०२३
राज्यातील अनेक तरुणांना आपल्या नृत्याने भुरळ घालणाऱ्या गौतमी पाटील हि गेल्या काही महिन्यापासून राज्यात चर्चेत येत आहे. तर ती जिथे जाते तेथे तुफान राडा होणार नाही अशी शंका नाकारता येत नाही. आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील कासारवाडी येथे गौतमी पाटील हिच्या नृत्याने अवघ्या युवावर्गाला घायाळ केले. अनेक तरुणदेखील च्यासोबत थिरकले पण या कार्यक्रमाला परवानगी नसल्याने संयोजक अमित लांडे आणि मयूर नामदेव रानवडे (दोघेही रा. कासारवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या कारणास्तव भोसरी पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. मात्र, त्याचवेळी आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घ्यावी, असेही सुचवले होते. मात्र आयोजकांनी त्यांच्या सूचनेकडे कानाडोळा करीत वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी न घेताच कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाची नशा उतरल्यावर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे.