जळगाव मिरर | २४ जुलै २०२४
रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी ढाब्यावर पोलिसांनी गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सह एका संशयित आरोपीला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, फैजपूर विभाग कार्यालय आणि रावेर पोलिस स्टेशनच्या पथकाने पाल ते रावेर रोडवर पंजाबी ढाब्यावर छापा टाकला. या छाप्यात इसम इरफान नबाब तडवी (वय -३६, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) याला अवैधरीत्या गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पो.उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.
पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पो.उपनिरीक्षक सचिन नवले, सुनिल पाटील, पोहेकॉ महेंद्र महाजन, अनिल इंगळे, गणेश मनुरे, जगदिश पाटील, पोकॉ विशाल शिवाजी पाटील, महेश मोगरे, पोकॉ प्रमोद पाटील, सचिन घुगे, समाधान ठाकूर यांनी संयुक्त कारवाई केली.