जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२६
चोपडा तालुक्यातील अडावद येथे दारुच्या नशेत गाढ झोपलेल्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिची निर्घण हत्या करणाऱ्या नराधम संशयित सुभाष गोपाल भिलाला (रा. वडती अडावद, ता. चोपडा) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, अडावदजवळील वडती गावात राहणाऱ्या सुभाष भिलाला याने रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या दोन्ही मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये १३ वर्षीय मुलगी मिरा भिलाला हीचा मृत्यू झाला तर ११ वर्षीय मुलगा रामू हा गंभीर जखमी झाला होता. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारा घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित सुभाष भिलाला याला अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी करून चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला दि. ५ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत कंडारे हे करीत आहेत.




















