जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२४
येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमीत्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हजारो रामज्योती प्रज्वलीत करण्यात आल्या. या रामज्योतींनी महाविद्यालयाचा परिसर अक्षरश: राममय झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान याप्रसंगी राम,लक्ष्मण, सिता यांचा सजीव देखावाही सादर करण्यात आला होता. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि डीजेच्या तालावर जय श्रीराम असा जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
अयोध्या येथे प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त देशभरात विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे देखिल शोभायात्रा काढण्यात आली. शोभयात्रेच्या रथाला आकर्षक रोषणाईने सजवून रथात प्रभु श्रीरामचंद्र,लक्ष्मण, सितामाई आणि परमभक्त पवनपुत्र हनुमानाच्या वेशभुषेत विदयार्थी सहभागी झाले होते. याचवेळी परिसरात प्रत्येक ठिकाणी आकर्षक व जय श्रीराम लिहीलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. शोभायात्रेत सहभागी प्राध्यापक, हजारो विद्यार्थ्यांनी व परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या जयश्रीरामच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. परिसरात सायंकाळी ८ वा हजारो विदयार्थ्यांनी रामज्योती प्रज्वलीत केल्या याचवेळी फटाक्याच्या आतीषबाजीने परिसर दणाणून गेला. शोभायात्रेत सहभागी विद्यार्थी सह परिसरातील सर्व नागरिकांनी भगवा फेटे परिधान केले होते. तसेच रांगोळी आणि भगव्या पताकांनी संपुर्ण परिसर भगवामय झालेला होता.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रामोत्सवानिमीत्त हजारो रामज्योती प्रज्ज्वलीत करण्यात आल्या होत्या. जय श्रीराम लिहीलेल्या या रामज्योतींनी रात्रीच्या समयी संपूर्ण परिसर हा रामनामात न्हाऊन गेला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी रामनामाचा जयघोषही केला.
या शोभयात्रेत प्राचार्य विशाखा गणविर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी सहकार्य केले