मेष : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आज तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये काही बदल कराल. मुलांसोबत वेळ व्यतित केल्यास मानसिक शांतता लाभेल. एखाद्या मित्राशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. इतरांच्या बोलण्यात येऊन तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता याची जाणीव ठेवा. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
वृषभ : आज कौटुंबिक कार्यात सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. तुमच्या आवडीच्या कामात काही वेळ व्यतित केल्यास तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. कोणत्याही अडचणींत मित्राचा सल्ला घ्या. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये परिस्थिती चांगली राहील. घरातील समस्यांवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.
मिथुन :आज समजूतदारपणाने नकारात्मक परिस्थितीतही कुटुंबाचे मनोबल टिकवून ठेवाल. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. काही वेळा एखाद्या विशिष्ट कार्याबाबत निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. यावेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका.
कर्क : आज आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला उत्साही वाटेल. खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मुलांबाबतच्या नकारात्मक माहितीमुळे मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. रागावण्याऐवजी शांतपणे समस्या सोडवा. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचारविनिमय करा.
सिंह : मित्र आणि नातेवाईकांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याने अनेक समस्या सुटू शकतात. आवडत्या कामांमध्ये थोडा वेळ व्यतित करा. तुमच्या हट्टीपणामुळे भावंडांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात. व्यवसायात परिस्थिती सामान्य असेल.
कन्या : आज प्रतिकूल परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कायम राहील. आईकडून विशेष सहकार्य मिळेल. मुलाच्या तब्येतीची थोडी चिंता राहील. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाशीही संवाद साधताना वाईट शब्द वापरू नका, व्यावसायिक क्रियाकलाप सध्या मंद राहतील.
तूळ : आज भाग्य तुमच्या पाठीशी आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांवरही तुमची श्रद्धा असेल. तुमचा संशयी स्वभाग त्रासदायक ठरू शकतो. तुमची काही कामे तणावामुळे अपूर्ण राहू शकतात. व्यवसायात चढ-उतार होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक : आज तुम्ही सामाजिक सेवा संस्थेसाठी विशेष सहकार्य कराल. तुमच्या कामाचे कौतुकही होईल. तुमचे एखादे रखडलेले महत्त्वाचे कामही पूर्ण होऊ शकते. इतर कामांबरोबरच घराच्या व्यवस्थेकडेही योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. कधीकधी कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा हस्तक्षेप वाढू शकतो, ज्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो.
धनु : प्रभावशाली आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल , असे श्रीगणेश सांगतात. तरुण करीअरबाबत गंभीर असतील. तुमच्यावर जास्त कामाचा बोजा असल्यामुळे कधी कधी तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमची कामे इतरांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा. काही वेळ आत्मचिंतनात घालवा.
मकर : आजची स्थिती अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्नही यशस्वी होतील. घरातील एकट्या व्यक्तीसाठी देखील एक उत्तम नाते येऊ शकते. उत्पन्नासोबत खर्चही वाढू शकतो. कौटुंबिक विषयात इतर व्यक्तीला ढवळाढवळ करू देवू नका.
कुंभ : आज तणावापासून आराम मिळवण्यासाठी विश्रांती आणि मनोरंजनाच्या मूडमध्ये असाल. आवडीच्या कामात वेळ घालवल्यास आनंद मिळेल. आज काही काम यशस्वी होतील. ज्येष्ठांशी संवाद साधताना नकारात्मक आणि अपमानास्पद भाषा वापरली जाणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा त्यांच्या पदरी निराशाच पडू शकते. आळशीपणा टाळा. कार्यक्षेत्रातील कामे सध्या मंद राहू शकतात.
मीन : आज ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. उधार घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी काळ अनुकूल आहे. अनुभवी आणि वृद्ध व्यक्तींच्या सहवासात थोडा वेळ व्यतित करा. काही कामे मनाप्रमाणे पूर्ण न झाल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नका. काळानुसार परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल.