• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी गिरीश रघुनाथ सूर्यवंशी यांच्या बदलीच्या अंमलबजावणीवरून सध्या विभागात विविध चर्चा रंगल्या आहेत. शासनाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार त्यांची उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) उत्तर विभाग, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिकारी अद्यापही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचा दावा होत असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी चर्चा कार्यालय परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.

महाराष्ट्र शासकीय अधिकारी-कर्मचारी बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४(५) अन्वये हा बदली आदेश जारी करण्यात आला होता. शासनाच्या आदेशातील क्रमांक ५ मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी पदभार सोडल्याची व नवीन ठिकाणी पदभार स्वीकारल्याची माहिती तातडीने शासनाला कळविणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, विहित कालावधीत अधिकारी रुजू न झाल्यास त्याबाबत शासनास कळवून आवश्यक शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूदही आदेशात नमूद आहे.

याशिवाय, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३०(सी) नुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याने नियोजित ठिकाणी रुजू न झाल्यास अशा परिस्थितीत रजेचे अर्ज स्वीकारू अथवा मंजूर करू नयेत, अशी तरतूद असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात अहिल्यानगर येथील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, गिरीश सूर्यवंशी यांनी अद्याप पदभार स्वीकारल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा आहे. त्यामुळे बदली आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक चर्चेचा मुद्दा पुढे आला आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार अशी चर्चा सुरू आहे की, गिरीश सूर्यवंशी आणि जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणे हे दोघेही संभाव्य नव्या नियुक्ती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे सध्याच्या बदली आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र, या चर्चेला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. या सर्व घडामोडींमुळे शासनाच्या बदली आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाली का, संबंधित प्रकरणात नियमांचे पालन झाले का आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार का, याकडे आता विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

संकटमोचकांचे खास मानले जाणारे थेट नाशिकला येणार ?
प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याच्या मर्जीतील असतात, तसेच जळगाव सार्वजनिक बांधकाममधील काही मोजके अधिकारी देखील संकटमोचकांचे खास मानले जातात तर दुसरीकडे नाशिक येथे कुंभमेळाव्याची तयारी सुरू असताना आता सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अधिकारी थेट नाशिकला बदली करण्याच्या तयारी असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !
जळगाव

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !
जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !

June 25, 2026
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !
जळगाव ग्रामीण

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group