जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विवाहितेला तिच्या नणंदचे पती यांनी अश्लिल शिवीगाळ करीत त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. ही घटना दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्याच परिसरात त्यांची नणंद राहत असून दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचे नणंदचे पती त्यांच्या कुटुंबियांसोबत वाद घालीत होते. विवाहिता त्यांच्या मोठ्या नणंद आणि त्यांच्या पतीसोबत त्यांचा वाद सोडविण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांना देखील त्या इसमाने शिवीगाळ केली. तसेच विवाहितेला त्यांच्या मोठ्या नणंदेच्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत त्यांना अश्लिल शिवीगाळ केला. यावेळी त्यांचा हात पकडून त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. विवाहिते तक्रारीवरुन इसमाविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे. पढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.