धरणगाव : प्रतिनिधी
घर बांधण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपया आणण्याची मागणी करत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, माधुरी तुषार महाजन (रा. धरणगाव) या विवाहितेने २ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आडगाव येथील घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये माहेरुन आणण्याची मागणी करुन सतत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. तसेच मुलगी कावेरी (वय ४ वर्षे) हीच्यासह माहेरी टाकुन घातल्याचेही माधुरी महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पती तुषार विश्राम महाजन (ह.मु.रा. कल्याण, मुंबई), सासरे विश्राम सुखदेव महाजन, सासू सरला विश्राम महाजन, संदीप विश्राम महाजन (दीर), योगिता संदीप महाजन(देराणी) (सर्व.आडगाव ता. एरंडोल ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना प्रमोद पाटील हे करीत आहेत.