फैजपूर : प्रतिनिधी
लोण (कर्ज) मंजुर करुन देण्याच्या नावाखाली फैजपूरच्या तरुणाला एक लाखात गंडवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आशिष युवराज तळेले (वय २३, धंदा – खासगी नोकरी) हा बामणोद येथे वास्तव्यास आहे. आशिषच्या मोबाईलवर मोबाईल क्रं ९९१११०३९०५ व ९६६७८५२९५० धारक यांनी फोन करून तुम्हाला भारती अँक्सा लाईफ ईन्सुरन्स कंपनीची पॉलीसीवर सहा लाख कर्ज मिळवून देतो अशी थाप मारली. त्यासाठी तुम्हाला pre payment charges साठी १७ हजार ५१२ रुपये तसेच क्रेडीट चार्ज म्हणून २५ हजार ५०० रुपये, फुल अँन्ड फायनल सबमिशन पेमेंट म्हणून ३० हजार रुपये आणि लोण फायनल मंजूर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा २८ हजार ४०० रुपये भरावे लागतील, त्यावेळेस तुमचे लोण मंजुर होईल असे सांगितले. त्यामुळे आशिषने १० ते २२ ऑगस्टच्या दरम्यान, १ लाख १ हजार ४१२ रुपये पाठविले. परंतू कर्ज न मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आशिषने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.उप. मसलोद्दीन शेख हे करीत आहेत.