जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२३
दि.१६ रोजी कुसुमताई फाऊंडेशन निःस्वार्थ अन्नसेवा व सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर इंद्रप्रस्थ नगर रिक्षा स्टॉप जवळ जळगांव येथे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात उच्च रक्तदाब,डोळे तपासणी,शुगर तपासणी,ECG तपासणी,हृदय तपासणी तसेच विविध आजार संबधी उपाचार्थी मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातील साधारण ३० ते ३५ रुग्णाची तपासणी केली.
यावेळी उल्हास पाटील मेडिकल फाऊंडेशन मधील डॉ.कनिष्का कौशल, डॉ.विनय बुरडकर, डॉ.आर्शल सर्जेरी व विजय राजपूत जनसंपर्क अधिकारी गोदावरी फाऊंडेशन व त्यांची संपूर्ण टीम यांनी लोकांची तपासणी केली.
या शिबिरात उपस्थित कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे, शुभम घाटे, पिंटू सोनवणे, दिवेश मांडोळे, विजय जैन, दाऊ सोनवणे, योगेश झनके अभिषेक जैन, देव टोकेकर, मोनु बाविस्कर , मयुर राजहंस, वेदांत वाणी यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.