जळगाव मिरर / २० जानेवारी २०२३
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या पक्षामधून बाहेर पडलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी आपली वेगळी चूल मांडत शिवसेना आमचीच त्यासाठी धनुष्यबाण हि आमचेच हा वाद न्यायालयात सुरु आहे. यावर आजही निकाल येऊ शकलेला नाही. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले तसेच पुढील सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली.
शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाणावर कोणाचा हक्क आहे? यावर अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं यावरचा निकालही लांबला असून यामुळं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा पेच अद्यापही कायम आहे. सुमारे चार तास आयोगात यावर युक्तीवाद पार पडला.
अनिल परब म्हणाले, कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे सर्व मुद्दे खोडून काढले. सविस्तर खुलासा दोन्ही वकीलांनी केला. सादीक अली यांच्या केससारखी येथे परिस्थिती नाही. पक्ष कार्यकारिणीचे सदस्यांचे बहुमत उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळे येथे सादीक अली केस लागू पडत नाही. धनुष्यबाण व पक्षाचे चिन्ह आम्हालाच मिळेल. तीस जानेवारीपर्यंत रिटन सबमिशन करायचे आहे.
ठाकरे गटाकडून जवळपास 1 तास 10 मिनीटे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ते केंद्रीय निवडणूक आयोगातून निघून गेले. तर देवदत्त कामत यांनी सुमारे 1 तास 25 मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांचा सुमारे 10 मिनीटे युक्तिवाद केला. ठाकरे गटातर्फे आज कपिल सिब्बल यांनी सुमारे एक तास दहा मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे महेश जेठमलानी यांना युक्तिवाद करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. ठाकरे गटाचा पूर्ण युक्तिवाद होऊ द्या त्यानंतर युक्तिवाद करावा असे सुचित केल्यानंतर सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी आज सुमारे 1 तास 25 मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद केला.