• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : फर्निचर दुकानाला भीषण आग : कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
हृदयद्रावक : फर्निचर दुकानाला भीषण आग : कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा परिसरातून रविवारी मध्यरात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. नेवासा फाटा कॉलेज परिसरात असलेल्या ‘कालिका फर्निचर’ या दुकानास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहत असलेल्या मयूर अरुण रासने यांच्या कुटुंबाला आगीने क्षणार्धात वेढले. आगीचा भडका इतका प्रचंड होता की घरातील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

या आगीत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल (वय 30), दोन मुले — अंश (वय 11) आणि चैतन्य (वय 6), तसेच वृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतदेह अत्यंत दुर्दैवी अवस्थेत आढळून आले. दरम्यान, मयूर रासने यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी हे मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने या आगीतून बचावले. त्यांच्या मुलगा, सून आणि नातवंडांचा जीव गेल्याची बातमी मिळाल्यावर त्यांच्या आक्रोशाने वातावरण हेलावून गेले.

प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुकानात लाकडी फर्निचर व इतर ज्वलनशील वस्तूंचे मोठे प्रमाण असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असले तरी, तोवर सर्व काही राख झाले होते. या घटनेमुळे नेवासा फाटा व परिसरात शोककळा पसरली आहे. शाळकरी वयातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू आणि संपूर्ण कुटुंबाची होळी झाल्याने स्थानिक नागरिक, समाजसेवक व प्रशासन हादरले आहेत. पुढील तपास पोलीस व अग्निशमन विभाग करत असून, मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !
जळगाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट
जळगाव

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !
क्राईम

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

महिलेच्या गळ्यातील पोत झडप घालून लुटणारे दोघे अटकेत; पोलिसांची धडक कारवाई !

December 6, 2025
२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !
जळगाव

२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

December 5, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group