
जळगाव मिरर / १ मे २०२३ ।

राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटता सापडले आहेत. यात साऱ्या महाराष्ट्राला वादळी वारे आणि पावसाने झोडपल्यानंतर दि ३० रोजी पुन्हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भर दुपारी तीनच्या सुमारास गारांच्या मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात रात्री अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा आहे. बुलढाण्यात आजचं तापमान हे 15.2 अंश सेल्सिअस आहे. थंड हवेमुळं मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुलढाण्यात गेल्या 70 वर्षात एप्रिल महिन्यातील आजचं नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.




















