• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा कहर : तिघांचा मृत्यू तर अनेकांचे नुकसान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा कहर : तिघांचा मृत्यू तर अनेकांचे नुकसान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२५

जळगाव शहरात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दि. ११ रोजी रात्री आठच्या हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शहरातील झाडे कोसळून रस्ते अडले होते. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मेहरूण येथे संतोष चिंधु तायडे यांची गाय वीज पडून ठार झाली.

जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पॉलीटेक्निक कॉलेजपासून बांभोरी कॉलेजपर्यंत अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने झाडे हटवण्याचे काम स रू केले होते. वादळामुळे शहरातील अनेक घरांच्या आणि दुकानांच्या पत्रे उडून गेले असून, मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हानी झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. यासंदर्भातील अधिकृत पंचनाम्यासाठी प्रशासनाने आज सकाळपासून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान रात्री उशिरा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेत होते.  जामनेर शहरातही जोरदार पाऊस झाल्याने तेथील जनजीवनही काही काळ विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची तीव्र सक्रियता सुरू असल्यामुळे सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चोपडा तालुक्यातील पळासखेडा मिरा येथे प्रियानी बरेला (३४) ही आदिवासी महिला झाडाखाली आसरा घेत असताना चिंचेचे झाड तिच्यावर कोसळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत झाडाच्या आडोशाला उभे असलेले इतर १५ जण जखमी झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे पितांबर वाघ (५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे नारायण पाटील (६८) यांना वादळात उडालेल्या पत्र्यांचा फटका बसून मृत्यू झाला.

दरम्यान, जळगाव शहरातील मेहरूण परिसरात वीज कोसळून संतोष तायडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. या आपत्तीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आपत्ती व्यवस्थापनाचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. महापालिका, महावितरण, वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले असून, मध्यरात्रीपर्यंत काही भागांतील वाहतूक आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आणि झाडांच्या आडोशाला न थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुरुवारपासून वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, बाधित नागरिकांना मदत दिली जाणार आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?
जळगाव

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !
जळगाव

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group