जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
धरणाजवळ गुरे चारत असताना अचानक वीज कोसळल्याने त्र्यंबक ओंकार अस्वार (बारी) (वय ७१, रा. शिरसोली प्र.न, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. याचवेळी त्याठिकाणी चरत असलेली म्हैस देखील दगावली. ही घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारातील नायगाव धरणाजवळ मंगळवारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न येथील रहिवासी असलेले त्र्यंबक अस्वार हे शेतीसह पशूपालन करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवार दि. २० रोजी दुपारी शिरसोली शिवारातील नायगाव धरणाजवळ असलेल्या शेतात गेले होते. त्याठिकाणी गुरे चारत असतांना दुपारच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी अस्वार यांच्या अंगावर वीज कोसळली आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या सोबतच त्यांच्या शेजारीच असलेली एक म्हैसही दगावली