• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, महाराष्ट्रातील पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२५

देशातील उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैस्वाल कुटुंबाने या दुर्घटनेमध्ये जीव गमावला आहे. राजकुमार जैश्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल आणि दोन वर्षांची मुलगी काशी जैस्वाल अशी मृतांची नावे आहेत.

उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (यूसीएडीए) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे केदारनाथ धामहून गुप्तकाशीकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. गोरीकुंड आणि त्रिजुणी नारायण दरम्यानच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 जण होते. या सातही जणांचा अपघतामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

आर्यन एव्हिगेशनचे हे हेलिकॉप्टर होते. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर शोध मोहीम सुरू केल्यावर हेलिकॉप्टर कोसळल्याचे स्पष्ट झाले. अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघाताचे ठिकाण अतिशय दुर्गम भागात असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.

दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघातामध्ये पायलटसह सातही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असून अन्य प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील होते. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडेतुकडे झाले असून घटनास्थळी मृतदेहाचे छिन्नविछिन्न अवशेष पडले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गढवालचे पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरुप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रविवारी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरने केदारनाथ धामहून गुप्तकाशीकडे उड्डाण घेतले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. याची माहिती मिळताच शोध आणि बचाव पथकाला रवाना करण्यात आले. शोधमोहिमेदरम्यान गौरीकुंडपासून 4 किलोमीटर वर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. अपघातात हेलिकॉप्टरमधील सात जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहेत. दरम्यान, उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापनाकडून 1070, 01352710334 आणि 9058441404 हे टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
क्राईम

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला
क्राईम

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026
पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !

August 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group