• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२६ 

शहरातील हॉटेल दरबार आणि सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) किरकोळ जखमी झाला असून, अपघातानंतर टँकर चालकाने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार,  गेल्या अनेक वर्षांपासून मंगला माळी या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. बुधवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघाल्या होत्या. हॉटेल दरबार आणि सीएनजी गॅस पंप परिसरात पोहोचताच भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की, मंगला माळी या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि त्यांच्यावरून टँकर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकी चालवत असलेला त्यांचा मुलगा भरत माळी किरकोळ जखमी झाला.

अपघातानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाडस दाखवत टँकरचा पाठलाग केला. आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर चालकाला अडवून त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेनंतर मंगला माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. ही बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

मंगला माळी या आपल्या कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा सांभाळ करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. एका निष्पाप आणि कष्टकरी महिलेचा बेपर्वा वाहनचालकामुळे झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेनंतर शहरातील भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची आणि निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group